90's Kid - एक हरवलेलं बालपण (The Last Generation to Experience a Time of Innocence)
“90’s Kid” म्हणजे मी इथे late 80’s and early 90’s मध्ये जन्मलेल्या लोकांना म्हणत आहे. Especially 1988-1995.
आपण Technology चा उदय होताना पहिला आणि Technilogy च्या अगोदरच सुंदर simple असं जग पण अनुभवलं. आपलं बालपण आजपण अनेक ठिकाणी non-digitally influenced childhood म्हणून ओळखलं जात. 90’s हे एक दशक होत जेव्हा Tech revolution सुरु झालं होत. या काळात Internet, Smartphone आणि Social Media यासारख्या नवीन technology जन्म घेत होत्या .या काळात आपण जो आनंद अनुभवला तो अमूल्य होता. आपण ज्या आठवणी तयार केल्या त्या आजही आपल्याला हसवतात आणि रडवतात.आपल्याला अशा अनेक गोष्टी अनुभवण्याची संधी मिळाली ज्या पुढील पिढ्यांना कधीही अनुभवता येणार नाहीत. आपण भाग्यवान आहोत की या काळात जन्माला आलो.
आपलं बालपण एवढं amazing होत कि आताची पिढी फक्त कल्पनाच करू शकते . Best Friend सोबत reply नाही दिला म्हणून भांडण नाही झाले किंवा B’day ला स्टेटस ठेवले नाही म्हणून कोणी रुसला नाही . आपण पावसात मनसोक्त भिजलो , कागदाची बोट बनवली, cycle वर फिरलो पण , चिखलाचे गोळे करून एकमेकांना मारले , घर/किल्ले बनवलॆ पण कधी पावसातले फोटो काढून Insta वर Story नाही टाकता आली किंवा Whatsapp वर Status नाही ठेवता आलं. कधी आई न पावसात जाऊच नाही दिलं तर खिडकीत चहा चा कप घेऊन मातीचा तो सुगंध अनुभवला. उन्हाळ्या मध्ये आईने मारे पर्यंत उन्हामध्ये Cricket अँड झाडाखाली गोट्या खेळल्या तर मामा कडे गेल्यावर कोया पण खेळल्या.
शाळेत असताना पण वेगळीच मजा होती. शाळेचा White युनिफॉर्म घाण होईपर्यंत वापरला , मित्रांनी त्यावर पेन नि रेषा मारल्या. २ रेघी and ४ रेघी वहीसाठी घरी हट्ट धरला . शाळेत महिन्याला तांदूळ घेऊन येण्यासाठी पिशव्या नेल्या . शनिवारची अर्धी शाळा and विसरलेला महिना अखेर ची अर्धी शाळेचं surprise पण वेगळं.कधी शाळेत जायची ईच्छा नसताना शाळे पर्यंत जायचे आणि कोणी राजकारणी नेत्याचे निधन झाल्याने शाळेला सुट्टी असल्याचा बोर्ड gate वर दिसायचा , ते सुरपरिसें तर वेगळंच आणि मग वापस येताना रस्त्यात भेटणाऱ्या सगळ्यांना सांगायचे कि शाळेला सुट्टी आहे तो आनंद पण वेगळाच.
शेवटी रविवार यायचा, रविवारची वाट पाहणं म्हणजे फक्त १२ ला लागणाऱ्या शक्तिमान and नंतर Junior G साठी . पाहण्यासाठी. त्यात कधी light जायची तर कधी TV वर "मुंग्या यायच्या" मग छतावर जाऊन अँटेना फिरवावा लागायचा. आई ४ ला लागणाऱ्या मराठी picture ची वाट पाहायची. त्या काळात पाहिलेले " तात्या विंचू" चा movie आणि "अशी हि बनवा बनावी " मधला " धनंजय माने इथेच राहतात का " dialogue आज पण तीच मजा देतो. बाबा वाट पाहायचे ते दूरदर्शन वर लागणाऱ्या ७ च्या बातम्यांची .
२००३ पर्यंत बोअर वाटणाऱ्या क्रिकेट मध्ये 1st time interest आला तो २००३ च्या वर्ल्ड कप फायनल match पासून. सर्वत्र एकच चर्चा होती कि ऑस्ट्रेलियासमोर भारत काही टिकणार नाही पण माझ्या बालिश मनाला वाटायचं कोण कुठली ऑस्ट्रेलिया आपल्याकडं सचिन सेहवाग द्रविड गांगुली हरभजन कुंबळे झहीर आहेत. पण match च्या दिवशी समजलं कि सगळे अशे का म्हणत होते. अजून आठवलं कि हसू येत कि पॉईंटिंग च्या Bat मध्ये स्प्रिंग होती....आणि मग २००४ नंतर धोनी क्रिकेट मध्ये आला दिवाळी च्या दिवशी मारलेल्या १८३* नंतर मग आयुष्यभरासाठी मनयामध्ये घर करून गेला त्यासाठी वेगळे बोललेलच बरे..
जसे आपण आपल्या दहावीच्या जवळ जवळ आलो , मोबाईल नावाचा प्रकार ऐकायला आला.तेव्हा 1st Time water bubble game आणि hand game सोडून मोबाइलला वर Snake game खेळला.कसे तरी फेसबुक काय असते समजले अँड छोट्या च्या स्क्रीन वर फेसबुक वर अकाउंट काढून messenger वर चाट करायला सुरुवात केली.
मुद्दा हाच कि आम्ही “90s Kid” आम्हाला भाग्यवान मानतो कारण आम्ही Technology न पुढे जाणारे जग and मागे सुटणारी Simplicity पहिली. Black and White TV पासून सुरू केलेले आम्ही आज HD/4K TV पण पाह्तोयत. Handgame , Mario चा विडिओ game खेळलेली आम्ही आता मोबाइलला मध्ये गमे पण खेळतोय. फक्त रेडिओ वर क्रिकेट and बातम्या ऐकलेले आम्ही आता मोबाइलला मध्ये बिनकामाचे रेडिओ आयकॉन पण पाह्तोयत. एका movie साठी रविवार ची वाट पाहणारे आम्ही आता Netflix,hotstar etc वर पाहिजे तेव्हा Movie पाह्तोयत. Nokia ११०० पासून सुरु केलेले आम्ही आज महागडे iPhone and One Plus पण पाह्तोयत. वहीवर डोंगर झाड and घर याचे चित्र काढणारे आम्ही आता घर डोंगर अँड झाडांचे Story and Reels पण ठेवतोयत. आम्ही या बदलत्या युगाच्या मधला पूल आहोत. एक युग तेव्हा बदलले जेव्हा Mobile and Internet चा शोध लागला आणि एक युग आता बदलतेय जेव्हा AI revolution Human Intelligence ला आव्हान देतय ..बघूया पुढे काय होत..
.png)


.png)
Comments
Post a Comment